Monthly Archives: April 2018

पाऊस पाहिजे?
तापमान कमी पाहिजे?
स्वच्छ हवा, पाणी पाहिजे?
जमिनीत पाण्याची पातळी वाढली पाहिजे?
इतर ब-याच गोष्टी आपल्याला पाहिजे?
कश्या मिळतील?

खालील आकडेवारी वाचा.

विचार करा.

दरडोई झाडांचे प्रमाण :
१.कॅनडा : ८९५२ झाडे

२.रशिया : ४४६१ झाडे

३.अमेरिका : ७१६ झाडे

४.चीन : १०२ झाडे

५.(महान ) भारत : २८ झाडे

जगातील सगळ्यात कमी दरडोई झाडांचे प्रमाण आपल्या देशात आहे.
” वसुंधरा दिनानिमित्त ” हे प्रमाण आले आहे.अत्यंत दयनीय परिस्थिती आहे.वॉर फुटिंगवर झाडे वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत,अन्यथा आपल्या पुढील पिढ्यांचे जगणे अवघड होईल आणि त्याला जबाबदार आपल्या व मागील पिढ्यांना धरण्यात येईल.

बघा वेळीच जागे व्हा
झाडे लावा
झाडे जगवा
पाणी जपुन वापरा

जागर पाण्याचा निसर्गाच्या रक्षणाचा
आता तरी जागे व्हा !!

मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से असलेले
तापमान आज ४3पार केले आहे.

पुढील प्रत्येक ५:५ वर्षात
४५:५० नंतर ६० अंश से
पर्यंत जाईल

तेव्हा अशी रडायची वेळ
येईल कि आहे ती झाडेही
सुकतील. तुमचा २२ हजारांचा ऐसी तुम्हाला दगा देईल .दिल्लीवाले पण
बुलेट ट्रेनने पानी पाठवणार नाहीत.
आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला
वेळ लागणार नाही..

रडू नका
लक्ष्यात असुद्या

तमाम नागरिकांना
जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.

१.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा
३ वर्ष पोटच्या मुलासारखे
संगोपन करा.
२. पानी वाचवण्याचा संदेश प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास
मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा

५ वर्षात 2 कोटी 50 लाख झाडे

मनापासून विचार करा

सर्वांनी एकत्र या
हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी
घर सोडा, एक दिवस पर्यावरन,संवर्धनासाठी द्या.

सैराट चे message पाठवण्यापेक्क्षा हा १०० वेळा पाठवा.सुखी व्हाल..

धन्यवाद !!

Advertisements

एक म्हातारा त्याचा आयुष्याचा प्रवास कसा झाला ? आणि शेवटी त्याला समजले तेव्हा तो काय सांगतो ? याबाबत मनोगत व्यक्त करतो ! त्यातून बरेच काही शिकता येईल ! .. ते मनोगत असे …….
🌹 प्रवास आयुष्याचा 🌹
“””””””””””””””””””””””””””””””””””””””‘”
माझे आयुष्य कसे गेले,
हेच कधी उमजले नाही l
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही ll
लहानपणी जमवायचो,
सोबतीला सारे सवंगडी l
विटीदांडू, आबाधुबी अन्
चेंडूफली कधी लंगडी ll
खेळताना मात्र स्वतःचा,
कधी विजय पाहिला नाही ll१ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही……
तारुण्यातही मित्रांसाठी,
केल्या ब-याच भानगडी l
नको नको झंझटांमुळे,
विस्कटली जीवनाची घडी ll
दुस-यांसाठी केली लफडी,
स्वतःसाठी एकही नाही ll२ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही ……
मग घेतला झेंडा खांद्यावर,
बनलो पक्षाचा कार्यकर्ता,
तेथे माझा उपयोग केला,
फक्त निवडणूकी पुरता ll
आंदोलनाच्या केसेस् मात्र,
अजूनही मिटल्या नाही ll३ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
झाले लग्न माझे अन् ,
थाटला नवा संसार l
तेव्हापासून लागला मागे,
आणा-आणीचा बाजार ll
अपार कष्ट करुनसुध्दा,
संसार पुरा झाला नाही ll४ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
मुले शिकून मोठी झाली,
अन् लागली कमवायला l
मुलगी गेली जावयासोबत,
मुलगा सुनेबरोबर गेला ll
आम्हा म्हाताऱ्यांसोबत,
कुणीही राहिला नाही ll५ll.
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
वयानुसार शरीर थकले,
आता जडले अनेक आजार l
आम्ही म्हातारा म्हातारी,
परस्परांना देतो आधार ll६ll
आता समजलेही सारे,
पण आयुष्य उरले नाही……
आयुष्याच्या या प्रवासात,
गरज आहे सद्गगुरुंची l
तेच देतात गुरुकिल्ली,
भगवंताला जाणण्याची ll
भगवतभक्तिच्या मार्गावर,
सद्गुरुशिवाय पर्याय नाही ll७ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही………
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
🙏🙏🙏

H

अगर बैंक की लाइन में मृत्यु के ज़िम्मेदार मोदीजी है, तो 1947 विभाजन के नरसंहार का ज़िंम्मेदार कौन ? बस वैसे ही पुछ रहा हुँ 😱
अगर बैंक की लाइन में मृत्यु के ज़िम्मेदार मोदीजी है, तो हजारो निर्दोष सिखो की हत्या का जिम्मेदार कौन ? बस वैसे ही पुछ रहा हुँ 😱
अगर बैंक की लाइन में मृत्यु के ज़िम्मेदार मोदीजी है, तो हज़ारो कश्मीरी पंडितों के नरसंहार का ज़िंम्मेदार कौन ? बस वैसे ही पुछ रहा हुँ 😱
अम्बानी ,अदानी, सिंघवी, टाटा, बिरला, माल्या, ललित मोदी,
*ये मोदी के कार्यकाल में अरबपति बने थे क्या ???*

क्या 85 अरबपतियों को जो 90 हजार करोड़ का लोन दिया गया था
*क्या वो मोदी के समय दिया गया …??*

जिस भी अफसर के घर छापा डाला जाए… तो करोड़ रुपये तो उसके गद्दे के नीचे ही मिल जाते है …
*क्या ये मोदी के काल में कमाए गये ….????*

*किस हद की मूर्खता पूर्ण देश भर में बातें है .*

मोदी के काल में तो माल्या के 8000 करोड़ के लोन के जवाब में ED ने उसकी 9120 करोड़ की संम्पत्ति को कब्जे में ले लिया है ..

*बस यही गलती हुई है कि मोदी अकेला भ्रष्ट लोगो के खिलाफ लड़ रहा है…*

और

*हमारे देश में नमक और नमकहराम दोनों पर्याप्त मात्रा में उपलब्ध हैं ….*
व्यक्तिगत रूप से आप *बीजेपी के विरोधी* हो सकते हैं।
बीजेपी की नीतियों के विरोधी हो सकते हैं ये एक सामान्य प्रकिया है..
और इसमें कुछ गलत भी नहीं है…

परंतु आप आलोचक की हद को पार करके *घृणित-निंदक* बनकर *PM की आलोचना* कैसे कर सकते हैं…?😳

आप उस व्यक्ति की आलोचना कर रहे हैं जो लगभग 15 सालों से CM के बाद, अब PM रहते हुए भी अपनी सैलेरी राष्ट्र को दान करता आ रहा है PM हाउस में अपना खर्चा स्वं उठाता आ रहा है..।

*Pm की निंदा-रस* में डूबते समय क्या आपको खयाल आया है कि क्या आपने कभी 1 महीने की सैलेरी राष्ट्र को दान किया है…?🤔😳🤔

₹-240 की LPG-Subsidy तो आप छोड़ नहीं पाते, बाकी.. क्या आप में हिम्मत है 1 साल की सैलेरी *राष्ट्र को दान कर दें…?*

तो फिर आप उस व्यक्ति की निंदा कैसे कर सकते हैं जो 15 सालों से ये सब करता आ रहा है….?🤔😳😰😡

3 बार गुजरात का CM रहने के बावजूद किसके पास कोई *बड़ी संपत्ति नहीं* है, परिवार को भी जिसने VIP सुविधाओं से वंचित कर रखा है ।

जिस PM के विदेशी दौरों को आप सिर्फ घूमने फिरने का नाम देते हैं जबकि असली उदेश्य *व्यापारिक समझौते और आपसी सम्बन्ध को सुधारना* होता है।

एक 66 साल का व्यक्ति 6 दिन में 5 देशों की यात्रा करता 40 महत्वपूर्ण मीटिंग में भाग लेता है। *देश का पैसा बचाने के लिए* ऐसी प्लानिंग करता है जिससे होटल में कम से कम रुका जाए, और, फ्लाइट में नींद पूरी की जाये….
उसके दौरे को आप सिर्फ भ्रमण का नाम देते हैं..?😳

*वैश्विक मंदी और ख़राब मौसम की मार* झेलने की बाद भी देश पर आंशिक प्रभाव पड़ा है…
और *देश आगे बढ़ रहा है*, क्या इतना काफी नहीं है..?
काँग्रेस द्वारा *60+ सालों से किये गये गड्ढे* क्या 4 साल में भर जायेंगे..?😳
अभी तक कांग्रेस की सरकारों से अगर 25% भी हिसाब माँगा जाता, तो ये दिन देखने नहीं पड़ते..🤔😳🤔

अगली बार PM की निंदा करने से पहले *अपने गिरेबान में झांककर देखें* और-
अपने आप से तुलना करें कि जिसकी आप निंदा कर रहे हैं, क्या उसके *पैरों की धूल के बराबर* आप हैं या नहीं..?🤔😰😡

कितने शर्म की बात है…..
एक तरह जिस व्यक्ति को *सारा विश्व सम्मान दे रहा है*….
वहीं दूसरी तरफ कुछ लोग (जो उसी देश के हैं) उसी सम्मान को गलत साबित करने पर तुले हैं… निवेदन है की इस पोस्ट को अधिक से अधिक शेयर करें और अपने देश के प्रधानमंत्री की गरिमा को मज़बूत बनायें 🙏
आप सबसे *निवेदन है, यह मैसेज अपने सभी व्हाट्सएप्प कांटेक्ट ओर फेसबुक पर जरूर शेयर करे..* और उन सभी को कहे की आप भी अपने व्हाट्सएप्प कांटेक्ट ओर फेसबुक दोस्तों में शेयर करे.

🇮🇳 *वन्दे मातरम् भारत माता की जय* 🇮🇳

**व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर
कामाचे मूल्य (Value) आणि शुल्क (Price) यातला फरक ओळखा**

Value vs. Price

एका जहाजामध्ये काहीतरी बिघाड होतो. यामुळे जहाज समुद्रात नेणे अशक्य होऊन बसते. जहाजाचे कर्मचारी सगळं जहाज तपासून पाहतात, पण त्यांना दोष काही सापडत नाही. अथक प्रयत्न करूनही जेव्हा त्यांना अपयशच येतं तेव्हा ते जहाज बांधणी मधील तज्ञ व्यक्ती ला बोलावतात. तो इंजिनियर येतो संपूर्ण तपासणी करतो… जहाजाच्या एका पॅनल मधील स्क्रू ढिल्ला झालेला असतो, त्यामुळे संपूर्ण बॉडी मध्ये प्रॉब्लेम तयार झालेला असतो. इंजिनियर तो स्क्रू पुन्हा पक्का बसवतो आणि जहाज पूर्ववत होते.
जाताजाता तो इंजिनियर त्याचे बिल जहाज कंपनीकडे सुपूर्द देतो आणि निघून जातो. ते बिल असतं दहा हजार रुपयांचे. एक स्क्रू पक्का बसवण्यासाठी दहा हजार रुपये कंपनीला जरा जास्त वाटतात म्हणून ते त्यांच्या एका कर्मचाऱ्याला त्या इंजिनियर कडे बिल दुरुस्त करायला पाठवतात. कर्मचारी जातो आणि इंजिनियर ला एक स्क्रू पक्का बसवण्याचे इतके बिल होऊ शकत नाही, बिल कमी करा असे सांगतो.

इंजिनियर त्या कर्मचाऱ्याच्या हातात नवीन बिल सोपवतो.
त्यात लिहिलेले असते स्क्रू पक्का बसवण्याचे शुल्क रु. १/- आणि कोणता स्क्रू ढिल्ला आहे हे शोधण्याचे मूल्य ९,९९९/-

यावरून तुम्हाला मूल्य आणि शुल्क (किंमत) यातला फरक लक्षत आला असेल अशी अपेक्षा करतो. मी एखाद्याला कन्सल्टिंग करतो तेव्हा त्यासाठी माझी कन्सल्टिंग आकारतो. त्यावेळी सुद्धा हि समस्या जाणवते. लोकांना वाटत कि दोन तास बोलायचे एवढे शुल्क कशाला. पण ते शुल्क नसते तर मूल्य असते माझ्या ज्ञानाचे, बुद्धीचे आणि वेळेचे. लोकांना समजावून सांगण्याच्या फंद्यात मी पडत नाही, कालांतराने व्यवसायात समस्या जाणवायला लागल्या कि ते पुन्हा माझ्याकडेच येणार असतात. ते ग्राहक म्हणून आपल्या फी ला शुल्क म्हणून पाहत असतात आणि आपण व्यवसायिक म्हणून आपले मूल्य ठरवत असतो.

असो… तुम्हाला तुमच्या कामाचे मूल्य ओळखता आले पाहिजे. कित्येक ठिकाणी तुम्ही पहिले असेल कि पारंपरिक कला असलेल्या लोकांकडून हाताने बनविलेल्या वस्तू अतिशय कमी किमतीत घेतल्या जातात. त्या उत्पादकांना आपल्याकडून पन्नास रुपयांना घेतलेली कलाकुसर बाहेर मार्केटमधे हजार रुपयांना विकली जाते हे माहीतही नसते. ते मिळेल तेवढे पैसे घेतात याचे कारण त्यांना त्यांच्या कौशल्याचे मूल्य माहित नसते. त्यांना फक्त त्यांच्या कामाची किंमत माहित असते. एखादा कलाकुसरीचा टेबल हजार रुपयांना मिळत असेल तर तोच टेबल एखाद्या मोठ्या ब्रॅण्डच्या नावाखाली लाख रुपयाला सुद्धा विकला जाऊ शकतो. कारण त्या ब्रँड ने आपल्या वस्तूचे मूल्य ठरवलेले असते किंमत नाही. रोल्स रॉयस कार मध्ये सात आठ कोटी खर्च करावेत असं काही नाही पण त्या ब्रँड चे मूल्यच इतके मोठे हे कि ती किंमतही तुम्हाला त्या गाडीसमोर फिकी वाटते. एखादी पेंटिंग करोडो रुपयांना विकली जाते याचे कारण तिचे मूल्य आहे, किंमत नाही.

कामाचे मूल्य मिळणं हि तशी सोपी गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागते, इतरांपेक्षा वरचढ व्हावे लागते, स्वतःचा ब्रँड बनवावा लागतो, इतरांकडे नसेल असे ज्ञान कौशल्य मिळवावे लागते… हे ज्यांच्यासाठी अवघड आहे त्यांना तसंही यश कमीच मिळतं. त्यामुळे यात तडजोड होऊ शकत नाही

कष्टाची किंमत मिळते, कौशल्याचे मूल्य मिळते. म्हणून कौशल्य आत्मसात करा. ज्या क्षेत्रात असाल त्यातले तज्ञ व्हा. अगदी बूट पॉलीश जरी करत असाल तरी त्यातले कौशल्य आत्मसात करा. लोक पॉलिश साठी दोन नाही दोनशे रुपये सुद्धा देतील.

आपल्या कामाचे मूल्य ओळखा, किंमत तर सगळेच करतात. तुम्हाला तुमच्या कामाचा परतावा शुल्क म्हणून नाही तर मूल्य म्हणून ज्यावेळी मिळायला लागतो त्यावेळी तुमची यशाकडे भक्कम वाटचाल सुरु झालेली असते हे लक्षात घ्या.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा..
समृद्ध व्हा…